Home » बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फाईव्ह स्टार हॉटेल सोडले

बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी फाईव्ह स्टार हॉटेल सोडले

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्यसभेतील निवडणुकीसाठी शिवसेनेने बुक केलेल्या पंचतारांकित सुविधा आणि अफाट खर्च पाहून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील सामान्य माणूस जागा झाला. त्यांनी तात्काळ फाईव्ह स्टार हॉटेल सोडले आणि आमदार निवास गाठले.

नेहमी चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आज पुन्हा एकदा चर्चेत आले ते वादग्रस्त वक्तव्याने नव्हे तर त्यांनी घेतलेल्या एका वेगळ्या निर्णयाने. आमदार संजय गायकवाड यांचा जीवनपट म्हणजे रस्त्यावरचा एक आक्रमक कार्यकर्ता. आमदार होण्यापूर्वी ते एक सामान्य शिवसैनिक होते, मात्र आमदार झाल्यावरही ते सामान्यच आहेत याचा प्रत्यय त्यांनी एक निर्णय घेऊन दिला आहे. केवळ प्रत्ययच नाही तर राज्यातील इतर आमदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

राज्यसभा निवडणुकीत आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवले आहे. शिवसेनेचे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्याच्या एका खोलीचे भाडे १६ हजार रुपये रोज आहे. अशा सुमारे ७० खोल्या शिवसेनेने बुक केल्या आहेत. मात्र या एसी खोलीत सामान्य माणसांचे आमदार असलेल्या गायकवाड यांचा दम कोंडल्याने त्यांनी हॉटेल सोडले आहे. ते आता आमदार निवासात गेले आहेत.

error: Content is protected !!