Home » बुलडाण्यात गणिताच्या तासाला विद्यार्थी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी

बुलडाण्यात गणिताच्या तासाला विद्यार्थी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी एका सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शाळेतील वर्गखोलीतील बाकावर गणिताच्या तासिकेला हजेरी लावली व शिक्षणाची पद्धत, परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशीही संवाद साधला. तुम्मोड बुलडाणा शहरातील खासगी अनुदानित शाळेचा दर्जा तपासणी एडेड हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचले.

तुम्मोड यांच्यासोबत उपजिल्हाधिकरी गौरी सावंत, उपविभागीय अधिकारी हांडे हे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी इयत्ता सातवीच्या वर्गात बसून गणित विषयाची माहिती घेतली. उजळणीमध्येही त्यांनी सहभाग घेतला. शिक्षक शिकवित असलेल्या तासिकेचे निरीक्षण केले. गणिताच्या ज्येष्ठ शिक्षिका जावरकर यांच्याकडून त्यावेळी गणिताचे अध्यापन सुरू होते. तासिका पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या कामकाजाची माहिती घेतली. शाळेचे विविध उपक्रम, खेळाचे मैदान याची देखील माहिती घेतली. शिक्षकांच्या अल्पसंख्येवरही यावेळी चर्चा झाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!