Home » गडकरी, फडणवीसांनंतर पोलिसांनाच बॉम्बची धमकी

गडकरी, फडणवीसांनंतर पोलिसांनाच बॉम्बची धमकी

by Navswaraj
0 comment

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान बॉम्बने उडविण्याची धमकीचा प्रकार ताजा असतानाच नागपूर पोलिसांना पुन्हा ‘बॉम्ब’ धमकी मिळाली. त्यामुळे पोलिस यंत्रणेत पुन्हा खळबळ उडाली. मुलीचा मृतदेह अद्याप प्राप्त झाला नाही. आपल्या  तक्रारीच्या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांनाच बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी नागपूर पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर हा कॉल आल्यानंतर नागपुरातील यशोधरानगर पोलिस ठाण्यात चांगलीच खळबळ उडाली.

पेट्रोलिंग सुरू असताना दुचाकीवरील बीट मार्शल यांना ११२ आपत्ती नियंत्रण कक्षाने सतर्कतेचे आदेश दिले. पोलिसांनी कॉल आलेल्या नंबरवर कॉलबॅक केला. मात्र तोपर्यंत नंबर स्वीच ऑफ करण्यात आला होता. याप्रकरणी कॉल करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यता आली आहे. तपास केल्यानंतर पोलिसांना सावनेर तालुक्यातील वलनी येथील एका कॉम्प्युटर हार्डवेअर सेंटरचा पत्ता सापडला. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!