Home » आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक

आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक

by Navswaraj
0 comment

– सुशिल अरुण देशमुख

भारताच्या लोकसंख्येमधील तरुण म्हणजेच नुकत्याच कमावत्या वयात आलेल्या लोकसंख्येचे प्रमाण बघितल्यास एक बाब लक्ष्यात येते कि धनाचा प्रत्यक्ष वापर करणारी लोकसंख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे (वय वर्ष २६-६०). पण याला दुर्दैव म्हणावं कि आमच्या शिक्षण प्रणाली मधली त्रुटी कि आज यामधून ५०% सुद्धा लोक पूर्णतः आर्थिक साक्षर नाहित. बचतीच्या पलीकडच्या महत्वपूर्ण आर्थिक बाबी या वयोगटातील कित्येकांना माहित देखील नाहीत. म्हणूनच समाजात आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मूळात कमाई, नफा किंवा पगार याबाबत मानसिकता चुकीची होत चालली आहे. ज्याप्रमाणे घरी आणलेलं दुध पहिले तापवून त्यावरील साय बाजूला काढली जाते नंतर याच जमा केलेल्या सायी पासून लोणी व तूप निर्माण केलं जाते ज्यांनी आपले जेवण रुचकर होते. त्याचप्रमाणे आपल्या प्राथमिक उत्पन्नामधून विशिष्ट रक्कम बाजूला करणे व हळू हळू साचलेल्या या रक्कमेची योग्य गुंतवणूक करून यावर नफा मिळविता येतो. मात्र यासाठी आपण नेमकी बचत किती करावी व गुंतवणूक कुठे करावी याबाबत संभ्रम असतो व यासाठीच आपण प्राथमिक स्तरावरील गुंतवणुकीचे ५ महामंत्र बघणार आहोत.

गुंतवणूक केंद्रीत नको : बरेच लोक आज देखील आपली सगळी गुंतवणूक LIC किंवा बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) म्हणून करतात आणि हे सपशेल चुकीचे आहे. गुंतवणुकीमध्ये आपल्या देशात विविध पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये सोने , विमा , व्याज , शेअर बाजार, मालमता इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. एकाच क्षेत्रात गुंतवणूक केल्याने प्राप्त होणारा नफा मर्यादित तर होतोच आणि नुकसान होण्याची शक्यता देखील जास्त राहते. म्हणून विविध पर्यायामध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक आगामी काळात समृध्द करते.

प्राथमिक माहिती : आज कालच्या स्पर्धात्मक आणि वेगवान काळात प्रत्येक बाबतीत अपडेट राहणे शक्य नसले तरीही तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या क्षेत्राची प्राथमिक माहिती करून घ्या. विना माहिती केलेली गुंतवणूक हि जुगारच असते. उदा: शेअर बाजारात गुंतवणूक, मालमत्तेमध्ये करीत असलेली गुंतवणूक इत्यादी.

अवधी आणि धनाची द्र्व्यता : गुंतवणूक करतांना रक्कमेची द्र्व्यता आणि वेळ दोन्ही बाबीचे महत्व लक्ष्यात घ्या. एखाद्या गुंतवणुकीचे रोखीकरण जितके सोपी तितकी द्र्व्यता जास्त. उदा : एखाद्या भूखंडाच्या किंवा दुकानाच्या तुलनेत सोन्याची द्र्व्यता जास्त आणि बँकेतील ठेवींची त्यापेक्षा जास्त असते. व अवधीनुसार गुंतवणूक करतांना द्र्व्यता लक्षात घ्यावी. उदा : मुलगी लहान असतांनाच तिच्या लग्नाच्या किंवा शिक्षणाच्या दृष्टीकोनातून घेतलेला भूखंड योग्य निर्णय आहे.

निष्क्रिय उत्पन्नाकडे (Passive Income) : तारुण्य म्हणजे प्रचंड उर्जा आणि सक्षम शरीर. त्यामुळे आपल्या तरुण वयात आपण विविध संधींचा लाभ घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले जातात उदा: पगार, व्यावसायिक नफा इत्यादी. मात्र वाढत्या वयासोबत आपली क्षमता कमी होत जाते व खर्च मात्र वाढत जातो. अश्यावेळी योग्य वयात निर्णय घेऊन निष्क्रिय उत्पन्नासाठी (Passive Income) गुंतवणूक करणे योग्य ठरते. उदा : निवृत्ती वेतन योजना. हाच पर्याय तुम्हाला आर्थिकरीत्या समृद्ध व चिंतामुक्त भविष्याकडे घेऊन जाईल. फक्त passive income ची तरतूद न केल्यामुळे शेवट गरिबीत आणि हलाखीच्या परिस्थितीत झाल्याचे अनेक उदाहरण आज आपल्याला समाजात बघायला मिळतात.

नियमित बचत :  आर्थिक गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे भांडवल असावेच असे नाही. बदलत्या काळासोबत गुंतवणुकीच्या संकल्पना देखील बदलल्या आहेत. नियमित SIP (Systematic Investment Plan) सारख्या मार्गांनी आपण कमी वेळेत समाधानकारक भांडवल निर्माण केल्या जावू शकते. मात्र यासाठी एक शिस्तबद्ध नियमित व योग्य ठिकाणी गुंतवणूक आवश्यक आहे. अशी कोणतीही गुंतवणूक करताना आपल्याजवळ चांगले आर्थिक सल्लागार असणे नितांत गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक सल्लागार आपल्याला बाजारातील जोखीम आणि फायदे दाेन्हीगबद्दल व्यवस्थितपणे अवगत करू शकतात.


(लेखक आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांचा संपर्क क्रमांक ८०८०६५६३१४ आहे.)

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!