Home » भाजपाचे महाराष्ट्रात सर्वांत मोठे जनसंपर्क अभियान

भाजपाचे महाराष्ट्रात सर्वांत मोठे जनसंपर्क अभियान

by Navswaraj
0 comment

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देश विश्वगुरू बनला आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे संपूर्ण एकत्रिकरण करून ‘हर घर चलो अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या अभियानाबद्दल माहिती दिली.

मोदींच्या काळातील गरीब कल्याणाच्या योजना, भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य यांमुळे भारत आज जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला बनलेला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जगातील १५० देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. या सर्व बाबी घेऊन आम्ही महाराष्ट्रातील तीन कोटी घरांपर्यंत जाणार आहोत. हे सर्वांत मोठे जनसंपर्क अभियान असणार आहे. केंद्रातील ५० पेक्षा अधिक नेते महाराष्ट्रात येणार आहेत. ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होणार आहेत. २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुथ प्रमुखांची रॅली होणार आहे. ३० मे ते ३० जून हे अभियान होणार आहे. आमचे आमदार, खासदार त्या-त्या जिल्ह्यांत माहिती देणार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींनी दिलेले जाहीरनामे पूर्ण केले आहेत. दरवर्षी आमचे सरकार आपला कार्यकाळ जनतेसमोर मांडतात. याही वर्षी सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळाची माहिती जनतेसमोर ठेवली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!