Home » चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण

चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण

by Navswaraj
0 comment

अमरावती : कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने, भाजपने चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधले. शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी भाजपने चांदुर बाजार तहसील कार्यालयाला तोरण बांधत हे आंदोलन करण्यात आले.

कांद्याची लागवड करतेवेळी कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झालेली होती. तरीदेखील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. हवामान बदलामुळे कांदा पीकांना शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना भाजपने कांदा भेट दिला.

भाजपचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, धम्मराज नवले, सुरेश वानखडे, मयूर खापरे, नितीन टिंगणे, मनीष निमकर, गजानन कोल्हे, आकाश साबळे, प्रवीण राऊत, आकाश आजणकर, शुभम पांडे, निलेश वासनकर, वैभव घाटोड, स्वप्नील बोबडे, रमेश तायवाडे, प्रदीप पंडागरे, विजय थोराईत, अमर पावडे, संजय गवणेर,राजेश शेलोकर,सचिन तायवाडे, मंगेश वासनकर, आशिष टिंगने, प्रवीण गणोरकर, समिर वानखडे, दीपक निमकर, गजानन राऊत, दीपक सायरे आदींनी हे आंदोलन केले.

error: Content is protected !!