Home » आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा टाईमपास

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा टाईमपास

by Navswaraj
0 comment

नागपूर : राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर टाईमपास करत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने नेमलेल्या आयोगा मार्फत सुरू झाले आहे. मात्र, अत्यंत चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा केला जात असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भूमिका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष असल्याचे मान्य केले. त्यानंतर आज बावनकुळे यांनी सरकार फक्त वेळ काढत असल्याचा आरोप केला.

  1. एका आडनावाचे अनेक समाजात लोक असतात मग आडनावाच्या आधारे ओबीसींचा सदोष डेटा गोळा करून सरकार ओबीसी समाजाचे नुकसानच करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयोगाची अशीच कार्यपद्धती राहिल्यास हे सरकार पुन्हा तोंडघशी पडेल, असे देखील बावनकुळे म्हणाले.
error: Content is protected !!