Home » भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान; शिवसेनेला मोठा धक्का बसणार

भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान; शिवसेनेला मोठा धक्का बसणार

by Navswaraj
0 comment

अमरावती : राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केले.

महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. ५.३० वाजता कोणता ते कळेल असं सूचक विधान त्यांनी केलं. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे असंही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरु आहे.

राज्यसभेतील उमेदवार

प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप).

संख्याबळ

१०६ भाजप

५५ शिवसेना

५३ राष्ट्रवादी

४४ काँग्रेस

अपक्ष व छोटे पक्ष २९

error: Content is protected !!