Home » सरकार कुणबी-मराठ्यांत भांडण लावतेय : नाना पटोले

सरकार कुणबी-मराठ्यांत भांडण लावतेय : नाना पटोले

by Navswaraj
0 comment

नागपूर : राज्य सरकारवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. हे सरकार नापास झालेले आहे. कितीही प्रयत्न केला तरी ‘डॅमेज कंट्रोल’ होऊ शकत नाही. हे सरकार दुतोंडी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खोटा कायदा आणून मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याचे काम केले. मराठ्यांना कुणबी करू असे म्हणत आता सरकारने फसगत करू नये. सातत्याने कुणबी मराठ्यांमध्ये भांडण लावण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरू आहे. असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, अहमदनगरचे नाव बादलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला. पण त्या विचाराने सरकारने काम करावे. केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचे काम सुरू आहे. अहिल्यादेवी मातेसारखे काम सरकारने करावे, त्या पद्धतीने राज्य कारभार करावा. औरंगाबादच्या नावाचा घोळ अद्याप कायम आहे. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. शहराचे नाव बदलून भाजपला फायदा होणार नाही. मागील नऊ वर्षांपासून विश्वगुरू म्हणणाऱ्यांनाही फायदा होणार नाही, असे पटोले म्हणाले.

नागपूर कोर्टात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवले. त्यात वकिलांनी माहिती लपवली असे सांगितले. फडणवीस कोणाची दिशाभूल करत आहे, असा सवालही पटोले यांनी केला. मराठा कुणबी असा भेद करून हे महाराष्ट्रात काय चालले आहे असे ते म्हणाले. कुणबी समाजाला किती आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण किती हे सरकारने आधी स्पष्ट करावे. मराठा व कुणबी समाज जागृत आहे. हा डाव यशस्वी होणार नाही. मराठा समाजाची ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र्य आरक्षण देण्याची मागणी होती. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार आहे, असे सांगून राजकीय पोळी शेकण्याचे काम भाजपा सरकारचे आहे. आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही, राज्य विधिमंडळात कायदा करून समाजाची फसवणूक केली, असे पटोले यांनी म्हटले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!