Home » फडणवीस हात जोडून म्हणाले, आम्हाला कळलंय काँग्रेसचे तीन मतदार फुटले

फडणवीस हात जोडून म्हणाले, आम्हाला कळलंय काँग्रेसचे तीन मतदार फुटले

by Navswaraj
0 comment

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटलांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

विधान भवनात मतदानादरम्यान विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील लॉबीतून एकाच वेेळी जात होतेे. लॉबीतून जात असताना फडणवीस यांनी तिघांना हसून नमस्कार केला. ‘आम्हाला माहिती आहे, काँग्रेसची तीन मते फुटली आहेत’, असे फडणवीस त्यांना म्हणाले. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर सुरू आहे. एकही मत फुटणार नाही यासाठी सर्व पक्ष कसून प्रयत्न करीत होते. अशांत फडणवीस यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!