Home » ‘अमरनाथ’साठी हवा वेगळा कक्ष : डॉ. अशोक ओळंबे

‘अमरनाथ’साठी हवा वेगळा कक्ष : डॉ. अशोक ओळंबे

by नवस्वराज
0 comment

अकोला : अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान ही यात्रा होणार आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्यात यावा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह भारतीय जनता पार्टीने केली आहे.

यात्रेकरूंसाठी एक्स-रे, ईसीजी, रक्त तपासणी अनिवार्य असते. तपासणी व प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात दोन-तीन दिवस लागतात. तपासणी कक्ष दुपारी एक वाजता बंद होतो. ईतर रुग्णदेखील रांगेत असतात. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना तासन् तास ताटकळत रहावे लागते. तपासणी करून प्रमाणपत्र घेणारे तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असलेल्या रुग्णांची गैरसोय होते.

१० मे नोंदणीची अंतिम तारीख असल्यामुळे, ज्यांनी पंजाब नॅशनल बँकेत कागदपत्रे जमा केली त्यांना अमरनाथ यात्रेला जाण्याची परवानगी मिळेल. आवश्यक सोपस्कार लवकरात-लवकर पूर्ण करून परवानगी मिळावी म्हणून ईच्छुक यात्रेकरू गर्दी करीत आहेत. यात्रेकरुंसाठी वेगळा कक्ष स्थापन करावा अशा आशयाचे निवेदन यात्रेकरूंच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे यांना देण्यात आले. निवदेन देणाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ईच्छुक यात्रेकरूंना होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी त्रास होऊ नये याहेतुने ग्रामीण रूग्णालय, जिल्हा महिला रूग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जातील असे डॉ. हाडोळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह संदीप देशमुख, धनंजय गिरधर, श्रीकांत येखंडे, डॉ. संजय धोत्रे, सचिन पाटील, विजय मोटे, केतन मेहता, डॉ. राजेश वर्धेकर, सचिन बोरेकर, निखिल यावलकर उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!