Home » दुकानदारांचे मोठे नुकसान : अमिताभ बच्चन विरोधात दिल्लीत तक्रार

दुकानदारांचे मोठे नुकसान : अमिताभ बच्चन विरोधात दिल्लीत तक्रार

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा दावा करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणकडे (सीसीपीए) तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर पुढील आठवड्यापासून बिग बिलीयन डेज सेल सुरू होत आहे. अभिनेता अमिताभ बच्चन या सेलचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने फ्लिपकार्ट तसेच अमिताभ बच्चन यांचे विरूद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल तक्रार दाखल केली आहे. नवी दिल्ली येथील व्यापाऱ्यांच्या संघटनेने आगामी बिग बिलीयन डेज निमित्त बच्चन यांच्या फिल्पिकार्टच्या जाहिराती विरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!