Home » भारतीय मजदूर संघाचे पंतप्रधानांना निवेदन

भारतीय मजदूर संघाचे पंतप्रधानांना निवेदन

by Navswaraj
0 comment

अकोला : भारतीय मजदूर संघाचे विसावे अखिल भारतीय त्रैवार्षीक अधिवेशन ७ ते ९ एप्रिलदरम्यान पाटना (बिहार) येथे संपन्न झाले. अधिवेशनात देशातील समस्त कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चर्चा होऊन, चार प्रस्ताव संमत करण्यात आलेत.

सामाजिक सुरक्षा सर्वांना उपलब्ध व्हावी, ठेकेदारी पद्धतीच्या अंधानुकरणावर बंदी आणावी, कंत्राटी कामगार सेवा ( निवारण तसेच नियमितीकरण ) अधिनियम १९७० मध्ये योग्य दुरूस्ती व्हावी, आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय श्रम नीती बनवावी, किमान वेतनाऐवजी (मिनिमम वेजेस) राहणीमान वेतन (लिव्हिंग वेजेस) निश्चित करावे.

पारीत ठरावाचे अनुषंगाने या आशयाचे निवेदन सर्व जिल्ह्यातील, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचे ठरले.
भारतीय मजदूर संघ अकोलातर्फे अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हामंत्री विवेक तापी, देशपांडे, जिल्हाध्यक्ष संजय बुटे, शेंडे, अकोला जिल्हा पोस्ट विभागाचे म्हैसने, प्रकाश घोगलीया, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे गणेश धारपवार, अनिल बोरसे, जिल्हा संघटक संतोष तारापुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन शर्मा, संतोष ढोबळे, संदीप मोकळकर, विजय कांबळे आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!