Home » मोदींच्या आग्रहाखातर राज्यपाल झालो : कोश्यारी

मोदींच्या आग्रहाखातर राज्यपाल झालो : कोश्यारी

by Navswaraj
0 comment

मुंबई : महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. राज्यपाल होण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, २०१६ मध्ये मी जाहीर केले होते की २०२९ लोकसभा निवडणूक लढणार नाही. राजकारण करणार नाही, असे देखील सांगितले होते. तेव्हा भाजपचे अध्यक्ष अमित शाह होते. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल व्हावे, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. त्यामुळे मी महाराष्ट्रात आलो.

पंतप्रधान असे म्हणत असतील तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. काही दिवस का होईना. महाराष्ट्रात जायला हवे, असे मला वाटले. त्यामुळे मी त्यांचे मत स्वीकारले. त्यांची विनंती मान्य केली आणि महाराष्ट्रात राज्यपाल झालो.

आपण राज्यपाल असताना अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले होते. अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामिल झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांची दया वाटत असल्याचे वक्तव्य केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!