Home » अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार गायब; परिवाराची पोलिसांत तक्रार

अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार गायब; परिवाराची पोलिसांत तक्रार

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख बेपत्ता झाल्याने त्यांच्या परिवाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी देशमुख मुंबईला गेले होते.

बेपत्ता होण्यापूर्वी देशमुख यांनी परिवारातील सदस्यांशी संपर्क केला होता. आपण मुंबई येथून अकोल्यासाठी निघत असल्याचे त्यांनी परिवारास सांगितले, मात्र ते बेपत्ता झाले. त्यांच्याशी फोनवर देखील संपर्क होत नसल्याने देशमुख यांच्या परिवाराने पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत देशमुख असावे असे त्यांच्या काही जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. देशमुख सूरतजवळील एका रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली असून रुग्णालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

error: Content is protected !!