Home » अकोला जिल्ह्यात जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव

अकोला जिल्ह्यात जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव

by Navswaraj
0 comment

अकोला : जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे 5 डिसेंबरला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

रवी राजगुरे याने स्वतःच्या डोक्यात वार करुन आत्महत्या केल्याचा देखावा सासुरवाडीच्या लोकांनी तयार केला होता. अकोला जिल्ह्यातल्या मनारखेड इथे ५ डिसेंबरला एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बाळापूर शहरातील रवी राजगुरेचा मृतदेह असल्याचे तपासात पुढे आले होते. पोलिसांना या संदर्भात सासरच्यांनी माहिती दिली, की रवीने स्वतः डोक्यात वार करून स्वतःला मारून घेतले. तपासादरम्यान सासरच्या लोकांनी रवीची हत्या केल्याचे समोर आले.

रवी सुरेश राजगुरे (वय ४०) हा ५ डिसेंबर रोजी सासरवाडी मनारखेड इथे गेला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर या प्रकरणात हत्येच्या दिशेने तपास सुरू झाला. रवी सुरेश राजगुरे (४०) याच्या मृत संदर्भात हत्याचा गुन्हा दाखल झाला. मृतकाचा चुलत भाऊ योगेश राजगुरे यांच्या फिर्यादीवरून मृतक रवीचा मेहुणा, मेहुणी, सासू आणि सासऱ्यांनी जड अवजारने डोक्यात वार करून खून केला. रवी आणि त्याच्या पत्नीत सतत वाद व्हायचा, या वादातून पत्नी रागाच्या भरात घर सोडून गेली. पत्नीच्या शोधात तो सासर मनारखेड इथे गेला. पत्नीच्या संदर्भात सासरच्यांना त्याने विचारणा केली. यावेळी सासरच्यांनी पत्नी संदर्भात माहिती द्यायला नकार दिला. त्यानंतर सासरच्या लोकांनी जड अवजाराने डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!