Home » आमदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले त्यांचा पक्ष वापरण्याची ऑफर

आमदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले त्यांचा पक्ष वापरण्याची ऑफर

by नवस्वराज
0 comment

अमरावती : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्ष नावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले आहे. यानंतर बडनराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट गरज भासल्यास माझा युवास्वाभिमान पक्ष तुम्ही घ्या अशी खास ऑफर दिली आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा या पाना हे चिन्ह घेऊन निवडून लढत आल्या आहेत. ‘सभी नटो का एक ही पाना असे रवी राणा’ असे त्यांना म्हटले जाते. यामुळे आपला युवास्वाभिमान पक्ष घेण्यासोबतच पाना हे या पक्षाचे अधिकृत चिन्ह घ्यावे, असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!