Home » अमरावती चार पोलिसांच्या आत्महत्या डॉ. आरती सिंह यांच्यामुळे : आमदार राणा

अमरावती चार पोलिसांच्या आत्महत्या डॉ. आरती सिंह यांच्यामुळे : आमदार राणा

by Navswaraj
0 comment

अमरावती : पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि राणा दाम्पत्यामधील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी महापालिकेतील शाईफेक, कधी हनुमान चालिसा तर कधी लव्ह जिहाद प्रकरणावरून राणा दाम्पत्याचे पोलिसांसोबत सातत्याने खटके उडत आहेत. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यात व पोलिसांत चांगलीच शाब्दिक धुमश्चक्री झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे.

बुधवार, १४ सप्टेंबर २०२२ रोजी बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात डॉ. आरती सिंह अमरावतीच्या पोलिस आयुक्त झाल्यापासून त्यांना कंटाळत चार पोलिसांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अलीकडेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. याप्रकरणात संबंधित मुलाच्या परिवाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या सर्व घडामोडींनंतर बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी पोलिस आयुक्त डॉ. सिंह यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!