अकोला : शहरातील मुख्य मार्गावरील महत्त्वाचे चौक अशोक वाटिका, चौक नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, टॉवर चौक इत्यादी ठिकाणी अकोला महानगरपालिकामार्फत नवीन वाहतूक सिग्नल लावण्यात आले होते. हे सिग्नल बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त होते. आता हे सिग्नल सुरू झाले आहेत.
सिग्नलबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत वेळोवेळी महानगरपालिका अकोला यांना पत्रव्यवहार कारण्यात आला. त्याबाबत पाठपुरावा घेऊन शहरातील बंद असलेले सर्व सिग्नल दुरुस्त करून सुरळीत पणे चालू करण्यात आले आहेत. शहरातील सर्व वाहनधारक यांनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नल नियमांचे तंतोतंत पालन करून वाहन चालवावी. सिग्नल जम्पिंग करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध मोटर वाहन कायदा अन्वये कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवून वाहतूक पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.