Home » Mumbai News : भारतातील अतिरेकी हल्ल्याचा अजून एक सूत्रधार ठार

Mumbai News : भारतातील अतिरेकी हल्ल्याचा अजून एक सूत्रधार ठार

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : पाकिस्तानी तुरंगात असलेला मुंबई वरील 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याच्यावर विषप्रयोग करण्यात आला. या वृत्ताची शाई वाळते ना वाळते तोच अजून एका अतिरेक्याला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केले. उधमपूर येथे 2015 मध्ये सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) ताफ्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 2 जवान शहीद तर 13 जखमी झाले होते. त्यानंतर लगेच 2016 मध्ये पंपोर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात 8 जवान शहीद आणि 22 जखमी झाले होते. या दोन्ही अतिरेकी मोहिमेचा सूत्रधार तसेच पुलवामा येथील हल्ल्यात महत्वपूर्ण भूमिका असलेला लष्कर प्रमुख हाफिज सईद चा निकटवर्तीय असलेला लष्कर – ए – तैय्यबाचा जहाल अतिरेकी अदनान अहमद उर्फ हंजाला अदनानवर हल्ला करण्यात आला. (Attack On Lashkar E Tayyaba Group Terrorist Adnan Ahemad Alias Hanjala Adnan)

अदनानच्या कराची येथील घराबाहेर 2 – 3 डिसेंबरच्या रात्री अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या. अदनानला जखमी अवस्थेत कराची येथील रूग्णालयात भरती केल. तेथे 5 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. नुकतेच अदनाननी त्याच्या मोहीमेचे तळ रावळपिंडीहून कराची येथे स्थलांतरीत केले होते. त्याच्या महितीनुसार अदनानला पाकव्याप्त काश्मीर मधील लष्कर – ए तैय्यबाच्या तळावर नवीन भरती करण्यात आलेल्या अतिरेक्यांना प्रेरणा देणे तसेच जहालवादी बनवण्यासाठी पाठवण्यात येत होते. भारतात घडवायच्या अतिरेकी कारवायांची जबाबदारी देखील त्याला सोपवण्यात आली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!