Home » समृद्धीची समृद्धी : दररोज सरासरी सात लाखांची टोल वसुली

समृद्धीची समृद्धी : दररोज सरासरी सात लाखांची टोल वसुली

by नवस्वराज
0 comment

नागपूर : उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची लोकार्पणानंतर समृद्धी होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून दररोज सुमारे सात लाख रुपयांची टोल वसुली होत आहे.

११ डिसेंबर २०२२ रोजी या मार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत २० कोटी रुपयांची टोल वसुली झाली आहे. समृद्धी महामार्गावरून आतापर्यंत ३ लाख ५४ हजार २८३ वाहनांनी प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत या महामार्गावर अडीचशे अपघातही घडले आहेत. या सुपर एक्स्प्रेस महामार्गावर १८ इंटरचेंजेस आहेत. त्यामुळे जेवढा प्रवास केला, तितकाच टोल वाहन चालकांना भरावा लागतो. महामार्गावर असलेल्या नाक्यापैकी सर्वाधिक टोल वसुली वायफड नाक्यावर झाली आहे.

कोणत्या टोलवर किती वसुली

वायफड                            : ६.५१
घायगाव-जांबरगाव            : १.६५
कारंजा इंटरचेंज (वाशीम) : १.३९ कोटी
कोकमठाण                      : २.१३ कोटी
माळीवाडा                       : १.११ कोटी
निधोना                            : २.४३ कोटी

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!