Home » ग्रामपंचायतींसाठी राज्यात ७४ टक्के मतदान

ग्रामपंचायतींसाठी राज्यात ७४ टक्के मतदान

by Navswaraj
0 comment

अकोला : राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवार, 18 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण झाली. प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

अकोला जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी 72 टक्के मतदान झाले. भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. भंडाऱ्यात मतदान प्रक्रिये दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मूळ गांव असलेल्या सुकळी येथुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली या गावात दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. जिल्ह्यात 1049 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायतसाठी सरासरी 72 टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात 93 ग्रामपंचायतीसाठी 70 टक्के मतदान झाले. नक्षलग्रस्त भागातील मतदान पथके मतदान संपवून हेलिकॉप्टरनी परत पोहोचली. दहा तालुक्यात 27 ग्रामपंचायतीची निवडणूक आज पार पाडली. यापैकी 21 ग्रामपंचायती नक्षलग्रस्त व अति संवेदनशील भागात होत्या.

गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायत पैकी 345 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावी जाऊन आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. बुलढाण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार पुढे आला. मतदारांना दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांवर थेट उमेदवारांचे नाव आणि चिन्हाचा उल्लेख होता. चिखली तालुक्यात हा गंभीर प्रकार घडला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!