Home » वर्ध्यात एसटी बसमधून 230 लिटर डिझेलची चोरी, गिरड आगारातील घटना

वर्ध्यात एसटी बसमधून 230 लिटर डिझेलची चोरी, गिरड आगारातील घटना

by Navswaraj
0 comment

वर्धा : जिल्ह्यातील गिरड आगारात उभ्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून 230 लिटर डिझेलची चोरी झाले.ल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,

रविवारी सायंकाळी सात वाजता नागपूरहून निघालेली बस गिरड डेपोत आली. रात्रीचा मुक्काम असल्याने चालकाने बस आगारात लावली आणि झोपी गेला. अज्ञात चोरट्यांनी बसमधील 230 लिटर डिझेल चोरून नेले.

सोमवारी सकाळी चालक बसजवळ पोहोचला तेव्हा त्याला डिझेलच्या टाकीजवळ तेल सांडलेले दिसले. तपासणी केली असता टाकीत डिझेल नसल्याचे आढळून आले. यानंतर चालकाने तत्काळ आगार व्यवस्थापकांना ही बाब कळविली. चालकाच्या तक्रारीवरून गिरड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!