Home » राज्यात पाऊस, पुराचा 15 हजार नागरिकांना फटका

राज्यात पाऊस, पुराचा 15 हजार नागरिकांना फटका

by नवस्वराज
0 comment

नागपूर : महाराष्ट्रात जूनपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा सुमारे 15 हजार नागरिकांना प्रत्यक्ष फटका बसला आहे. आतापर्यंत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले आहे.

गडचिरोलीसह अनेक ठिकाणी अद्यापही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गडचिरोली येथे एसडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!