Home » महापुरात बचवासाठी चंद्रपुरात लष्कराची मदत

महापुरात बचवासाठी चंद्रपुरात लष्कराची मदत

by Navswaraj
0 comment

प्रसन्न जकाते

चंद्रपूर : विदर्भात अतिवृष्टी आणि पुराचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोलीला अद्यापही पूरवेढा कायम आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यात आता महापूर आला आहे. परिस्थिती ईतकी गंभीर झाली आहे, की बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे.

नागपुरातील कामठी भागात असलेल्या लष्करी केंद्रातून मेजर भुवन शहा यांच्या नेतृत्वात गार्ड्स रेजीमेंट सेंटरच्या जवानांना चंद्रपूरच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले आहे. सैन्याच्या मदतीने राज्य आपत्ती निवारण पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. माणगावला पुराचा ईतका भयंकर वेढा होता की, सैन्याची मदत घेत गावकऱ्यांना पुरातून बाहेर काढण्यात आले. ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी देखील मदत कार्यात सहभाग घेतला.

विदर्भातील पूरस्थिती पाहता कामठी येथील लष्करी केंद्राला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कामठी येते एक आपत्कालीन पथक 24 तास सज्ज ठेवण्यात आले आहे. याशिवाय राज्य आपत्ती नियंत्रण दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दल (एनडीआरएफ), सर्व जिल्हा पोलिस दल, होमगार्ड, आरोग्य यंत्रणा देखील संपूर्ण विदर्भात ‘हाय अलर्ट’वर आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!