अकोला : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला शस्त्र विक्री बाबत मिळालेल्या गुप्त माहितीचे अनुषंगाने खोलेश्वर येथील रहिवासी संमू राजपूत याला ताब्यात घेण्यात आले. त्याचे जवळून सात जिवंत काडतुस, दोन गावठी पिस्तुल, दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. त्या शस्त्रांची तो विक्री करणार होता. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली की, गौरक्षण रोड येथील रहिवासी हरी झाडे आणि उमरी येथील आकाश आसोलकर यांच्याशी, त्याने शस्त्र विक्री बाबत व्यवहार केला. त्यानंतर हरी झाडे, आकाश आसोलकर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. शस्त्रांची एकूण किंमत रूपये एक लाख तेरा हजार पाचशे आहे.
आर्म ॲक्टनुसार आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांचे सहकारी दशरथ बोरकर, राजपाल ठाकूर, गणेश पांडे , फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धीरज वानखडे, मोहम्मद आमीर, लीलाधर वानखडे, अंसार शेख यांनी कारवाई पार पाडली.