Home » अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठाणे

अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठाणे

by Navswaraj
0 comment

गोंदिया : सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे ठरले आहे. देशपातळीवर १० पोलिस ठाण्यांची उत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या गृह विभागाने पोलिस स्टेशनमध्ये निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी देशपातळीवर १० पोलिस ठाण्यांची उत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे ठरले आहे. या स्पर्धेमध्ये देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन २०२० या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची निवड करुन सदर पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!