Home » अर्जुन तेंडुलकरने उडवली दिग्गजाची दांडी

अर्जुन तेंडुलकरने उडवली दिग्गजाची दांडी

by admin
0 comment

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर अर्जुन तेंडुलकर ‘आयपीएल’मध्ये कधी पदार्पण करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. अर्जुन मागील सिझनपासून ‘मुंबई इंडियन्’सकडे आहे. त्याला यंदाच्या ऑक्शनमध्ये ३० लाखांना मुंबईने खरेदी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा जोरात आहे.

 


 

अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा सुरू असतानाच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा स्टार बॅटर इशान किशनची एका अचूक यॉर्करवर दांडी उडवली आहे.अर्जुनने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ‘आयपीएल २०२२’च्या लिलावात सर्ंवात जास्त किंमत मिळलेल्या इशान किशनला अर्जुनच्या यॉर्करपुढे कसलाही बचाव करता आला नाही. इशानने बॅट जमिनीवर आणण्यापूर्वीच त्याची दांडी उडाली होती. अर्जुनचा हा जबरदस्त यॉर्कर पाहून त्याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्याची मागणी फॅन्सनी केली आहे.

error: Content is protected !!