Home » हर घर तिरंगा प्रचार रथावर अमरावतीत हल्ला

हर घर तिरंगा प्रचार रथावर अमरावतीत हल्ला

by Navswaraj
0 comment

अमरावती : हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचार रथावर दोन समाजकंटकांनी हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. प्रचारासाठी फिरत असलेल्या वाहनावर शहरातील कॉटन मार्केट परिसरामागे असणाऱ्या हॉटेल आदर्श समोर काही समाजकंटकांनी हल्ला केला. यावेळी या प्रचार रथावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांच्या छायाचित्रांसह असणाऱ्या हर घर तिरंगा रॅली अभियानाचे पोस्टर पाडले.

याप्रकरणी अमरावती शहर भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. अमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणीही भाजपने केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!