Home » एक कोटींची लाच घेतांना सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडले

एक कोटींची लाच घेतांना सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडले

by Navswaraj
0 comment

अहमदनगर : पाईपलाईनच्या कामाचे बील काढण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. छत्रपती संभाजी नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय ठेकेदाराने नगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बील त्यानं टाकले होते. बिलावर तत्कालिन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्या मागील तारखेचे जावक करून सह्या घेणे व देयक पाठवण्याच्या मोबदल्यात सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड यानं स्वतःसाठी व गणेश वाघ याच्यासाठी एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात शासकीय ठेकेदारानं नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

नाशिक येथील पथकाने नगर-संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिल्डिंगच्या बाजुला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची रक्कम एक कोटी रूपये अमित गायकवाड याने स्वतःसाठी तसेच गणेश वाघ याच्या नावाने एका ईनोव्हामध्ये साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. गायकवाडने गणेश वाघ याला फोन करून लाचेच्या रक्कमेबाबत माहिती दिली. त्याच्या वाट्याचे ५० टक्के कुठे पोहोचवायचे याची विचारणा केली.

याप्रकरणात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली. अमित गायकवाड आणि गणेश वाघ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व बाबींचा उलगडा नाशिक पथक करणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!