Home » Amravati Police : अमरावतीत अटक झाले पुण्‍यातून फरार गुन्‍हेगार

Amravati Police : अमरावतीत अटक झाले पुण्‍यातून फरार गुन्‍हेगार

by Navswaraj
0 comment

अमरावती : गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून पुण्यातून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अमरावतीमध्ये अटक केली आहे. पोलिसांना गुंगारा देत हे सराईत गुन्हेगार अमरावतीत आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना पडकले आहे. (Amravati Police arrested two gangsters absconding from Pune after hardcore crime)

पोलिसांनी आशियाड कॉलनी चौकातून या दोघांना ताब्‍यात घेतले आहे. त्‍यावेळी ते कारमध्‍ये होते. आरोपी हे पुणे जिल्‍ह्यातील मुळशी तालुक्‍यातील टोळीचे सदस्‍य आहेत. विपुल उत्तम माझिरे (वय २६, रा. रावडे ता. मुळशी) व प्रदीप उर्फ पंकज धनवे (वय २०, रा सिंहगड रोड, दत्तवाडी, पुणे) ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष धुमाळ (रा. मुळशी, पुणे) हा तिसरा आरोपी पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला. पुण्याच्या पौड पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्हयातील संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार पुणे येथून पळून अमरावतीत आश्रयाला आले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमरावती शहर पोलिसांना देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!