Home » आमदार देवेंद्र भुयारांना तीन महिने कारावास

आमदार देवेंद्र भुयारांना तीन महिने कारावास

by नवस्वराज
0 comment

अमरावती : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भुयार यांनी पाणी प्रश्नावरुन आक्रमक होत गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाण्याची बाटली फेकून मारली होती. २०१९ मधील प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून देवेंद्र भुयार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा कोर्टाने भुयार यांना तीन महिने कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

२०१९ मध्ये अमरावती जिल्हा परिषदेत पाणी टंचाई विषयावर विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन सीईओ मनिषा खत्री, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुभाष बोपटे पाणी टंचाईवर माहिती देत असतानाच देवेंद्र भुयार यांनी त्यांच्यावर माईक आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्याचा आरोप झाला होता. भुयार यांना सभेतून बाहेर काढण्यात आले होते. सभेत पाण्याच्या बॉटल्स मारल्यानंतर भुयार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

error: Content is protected !!