Home » अमरावती पदवीधर : मतमोजणी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

अमरावती पदवीधर : मतमोजणी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

by Navswaraj
0 comment

अमरावती : मतमोजणीवेळी अस्वस्थ वाटल्याने घरी परत आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या  तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणीदरम्यान हा प्रकार घडला. शाहुराज चैतुजी खडसे (वय ५५, रा. ग्रेटर कैलासनगर, महादेव खोरी) हे निधन झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना बुधवारी १ फेब्रुवारीपासून तैनात करण्यात आले होते. त्यात खडसे यांचाही समावेश होता. अशात त्यांना २ फेब्रुवारी २०२३ रोजी अस्वस्थ वाटु लागले, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. रात्री अस्वस्थ वाटल्याने त्यांनी रात्रीच घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेवण केल्यानंतर खडसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाइकांनी लगेच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना खडसे यांचा मृत्यू झाला, असे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शाहुराज खडसे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!