Home » Amravati Crime : तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ७७ जणांना अटक

Amravati Crime : तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ७७ जणांना अटक

by Navswaraj
0 comment

अमरावती (Amravati): रेल्‍वे गाड्यांचे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरक्षणाचे कन्फर्म तिकीट देणाऱ्या दलालांना अटक करण्यात आली आहे. हे दलाल अधिक पैसे वसूल करीत रेल्वे प्रवाशांची लूट करीत होते. (Amravati Central Railway Bhusawal Division Police Arrested 77 Persons for Black-marketing of Tickets)

मध्‍य रेल्वेच्‍या भुसावळ विभागात एप्रिल ते ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत तिकिटांच्‍या काळाबाजार प्रकरणी ७२ गुन्‍हे दाखल करण्‍यात आले असून ७७ जणांना अटक करण्‍यात आली आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध मोहीम मध्य रेल्वेने तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्‍य रेल्‍वेचे सुरक्षा पथक छापे टाकत आहे. दलालांकडुन खरेदी केलेल्या ऑनलाईन अवैध तिकीटांवर प्रवास करता येत नाही. यासंदर्भात प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे रेल्वेने म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!