Home » शिक्षक संघटनेच्या अकोला महानगर अध्यक्षपदी अमित शिरसाट

शिक्षक संघटनेच्या अकोला महानगर अध्यक्षपदी अमित शिरसाट

by Navswaraj
0 comment

अकोला : महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेच्या अकोला महानगर अध्यक्षपदी शिक्षक मारोतीसा सावजी प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक अमित शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनिष गावंडे यांनी ही नियुक्ती केली आहे.

शिरसाट यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. याप्रसंगी अमरावती विभागातील खासगी शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिरसाट यांचा शिक्षकांमध्ये असलेला जनसंपर्क पाहता त्यांना हे पद बहाल करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

खासगी शिक्षकांना नियुक्तीपासून वेतनापर्यंतच्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी त्यांच्यावर अन्यायही होतो. शिक्षकांची पिळवणूक होते. त्यांना धमकाविण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी आपण लढणार असल्याचे अमित शिरसाट यांनी यावेळी सांगितले

error: Content is protected !!