Home » अकोल्यात पुन्हा एकदा मोर्णा नदी स्वच्छता अभियान

अकोल्यात पुन्हा एकदा मोर्णा नदी स्वच्छता अभियान

by Navswaraj
0 comment

अकोला : मोर्णा नदी स्वच्छता अभियान २०१८ मध्ये राबविण्यात आले. अकोलेकरांनी त्याला तन, मन, धनाने प्रचंड प्रतिसाद दिला. ज्याची नोंद देशाचे प्रधानमंत्री आणि संपूर्ण जगाने घेतली. राज्य शासनाने देखील या उपक्रमासाठी भरघोस आर्थिक सहाय्य केले. नदीच्या काठावर खांब गाडून त्यावर सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावले होते. जेसीबी मशिनच्या  सहाय्याने पात्राचे खोलीकरण तसेच काही बांधकाम देखील करण्यात आले.

परंतु नेहमी प्रमाणे अकोलेकरांचे दुर्दैव आडवे आले. काम ठप्प झाले. सौरदिवे आणि काही खांब देखील गायब झालेत. नदीचे पात्रात पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले. नागरीकांचे श्रम, पैसा तसेच शासनाने दिलेले कोट्यवधी रूपये घाणीत गेले. आता महानगरपालिका प्रशासन पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबवत आहे. नदीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. हा उपक्रम जर सणासुदी पुरताच असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. महानगरातील सर्व नाल्यांचे पाणी नादीपात्रात सोडले जाते, यामुळे नदीचे पाणी जास्त दूषित होते. नदीत कचरा टाकणे हा भाग तर आहेच. विकासाचा कुठलाही उपक्रम नागरीकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या इच्छाशक्ती शिवाय पूर्ण होत नाही. दोघांच्या समन्वयाने मोर्णा नदी स्वच्छते बाबत कायम स्वरुपी तोडगा काढला तरच हे अभियान यशस्वी होईल असे अनेक स्वच्छताप्रेमी नागरिकांचे मत आहे.

error: Content is protected !!