Home » अकोल्यात अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार ही विकृती

अकोल्यात अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार ही विकृती

by नवस्वराज
0 comment

अकोला : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ही विकृती असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अकोल्यात बोलताना केली. “त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली आहे. पुढे आणखी कुणाकुणाला करतील ते दिसेलच”, असे ते म्हणाले.

वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केली. त्यानंतर अब्दुल सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले होते. “मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नाही. मला राजकारणात 40 वर्ष झाले आहेत, मग मी असं का वागेन? ही फेक न्यूज आहे”, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी यावर दिले होते. मात्र दानवे यांनी अकोल्यात सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला. नाव आणि निवडणूक चिन्ह गेले तरी महाराष्ट्रासाठी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ एवढे म्हटले तरी पुरेसे आहे, असे दानवे म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!