Home » मराठी असे मायबोली तरी……

मराठी असे मायबोली तरी……

by admin
0 comment

वसई-पालघर परिसरातील मराठी साहित्य हे या भूमीतील वाडवळी, सामवेदी (कादोडी), वलकर (ईस्ट इंडियन), आगरी, कोळी, वारली अशा बोलीभाषांतून उमलले आहे व आज त्याला भरघोस फुलोरा आलेला दिसत आहे. मराठीच्या या भाषाभगिनी त्या-त्या समाजगटांचा सामूहिक वारसा व पूर्वसंचित आहेत. ‘मराठी आमुची मायबोली…’ अशा प्रकारच्या काव्यपंक्तींतून प्रमाण मराठीचा ‘गर्जा जयजयकार’ होत असला, तरी वास्तवात बोलीभाषा हीच आपली मातृभाषा असते. बोली आईच्या रक्तातून आपल्या ओठांवर उमलते. आपली जाणीव व नेणीव बोलींनी व्यापलेली असते. मराठीची श्रीमंती या बोलींमुळेच वाढलेली आहे. पालघर जिल्हा उत्तर कोकणात मोडत असला, तरी येथील बोलींना कोंकणी म्हणता येणार नाही. कोंकणी, काठेवाडी, गुजराथी, अरबी, फारसी, पोर्तुगीज व इंग्रजी अशा भाषांतील शब्दांना सामावून घेत त्या परिष्कृत झाल्या आहेत. या बोली अलंकारिक व ठसकेबाज आहेत. त्यांचे नादमाधुर्य व खुमारी त्या बोलण्यात व ऐकण्यात विशेष जाणवते. अन्य भाषकांना या बोली लिखित स्वरूपात वाचताना थोडे अडखळल्यासारखे होते, हे खरे.

error: Content is protected !!