Home » अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची जाहिरात

अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची जाहिरात

by Navswaraj
0 comment

चेन्नई : ‘झुकेगा नही साला..’ या संवादामुळे कोट्यवधी लोकांचा स्टार बनलेल्या तमिळ अभिनेता अल्लू अर्जुन याने तंबाखूची जाहिरात नाकारली आहे.

तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला बरीच मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र अल्लू अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता ही ऑफर नाकारली. रूपेरी पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेता, अभिनेत्रींचे अनुकरण करीत युवा पिढी आपला आवडा स्टार जसे करतो, त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. ते जे उत्पादन वापरतात किंवा त्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये हे स्टार दिसतात, तेच उत्पादन वापरण्यावर तरुणाईचा भर असतो. आपल्या चाहत्यांनी आपल्याला तंबाखूच्या जाहिरातीत बघुन त्याचे सेवन करू नये, असे नमूद करीत अल्लूने तंबाखूचा प्रचार करणारी जाहिरात ऑफर नाकारली आहे.

अल्लू स्वत: अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करीत नाही. त्यामुळे त्याने ही ऑफर अस्वीकृत केली. चित्रपटांमध्ये अल्लू सिगारेट ओढताना दिसत असला तरी ती वस्तुस्थिती नाही, असे त्याच्या कार्यालयाकडुन स्पष्ट करण्यात आले. तंबाखू पदार्थांचा प्रचार करणारी जाहिरात केल्यास युवा पिढीत चुकीचा संदेश जाईल, असे अल्लूने स्पष्ट केले. अशा प्रकारे तंबाखूचा प्रचार करणाऱ्या जाहिरातीची ऑफर नाकारणारा अल्लू पहिला व्यक्ती नाही. यापूर्वी साई पल्लवी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकी आदींनी अशा ऑफर नाकारल्या आहेत.

error: Content is protected !!