Home » अटकेमागचे सर्व हात शोधणार : अनिल देशमुख यांचा ईशारा

अटकेमागचे सर्व हात शोधणार : अनिल देशमुख यांचा ईशारा

by Navswaraj
0 comment

नागपूर : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर मुक्त झाल्यानंतर तब्बल २१ महिन्यांनंतर स्वगृही म्हणजेच नागपुरात परतले. स्वगृही परत येताच देशमुखांनी त्यांच्या अटकेमागील ‘करवित्या धन्यांना..’ ईशारा दिला आहे. आपल्या अटकेमागील सर्व अदृष्य हात शोधुन काढणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला.

‘दहशतवादी कसाबला ठेवले त्याच तुरुंगात मलाही टाकण्यात आले होते. माझ्या कुटुंबीयांचाही छळ करण्यात आला. माझ्या अटकेमागील अदृश्य हात कुणाचे आहेत हे मी बघणार आहे. २१ महिन्यांनंतर मी नागपूरला आलो. सगळे सहकारी भेटले. त्यांना मला पाहता आले. त्याचा मला आनंद झाला. मला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. न्याय देवतेवर मला विश्वास होता. त्यांनी न्याय दिला आणि मी बाहेर येऊ शकलो. माझ्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. माझ्यावर १०० कोटी वसुली केल्याचा आरोप झाला. पण एक लाखाच्या आरोपाचाही ते पुरावा देऊ शकले नाहीत. माझ्या २३० सहकाऱ्यांच्या साक्षी घेण्यात आल्या. माझे घर आणि कार्यालयावर १३० वेळा धाडी टाकल्या. मात्र त्यांना काहीही मिळाले नाही’, असे देशमुख म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!