Home » ब्रह्मपुरीतील अलंकार टॉकीज आगीत खाक

ब्रह्मपुरीतील अलंकार टॉकीज आगीत खाक

by Navswaraj
0 comment

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : ब्रह्मपुरी शहरातील आरमोरी मार्गावर असलेल्या अलंकार सिनेमागृहाला गुरुवार, २० एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.

या आगीत सिनेमागृहातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंलकार हे एकमेव सिनेमागृह आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिनेमा गृहाला आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते.

आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचार्‍यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता हा प्रकार निदर्शनात आला. या आगीत यंत्र, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच ब्रह्मपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप कळु शकले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!