Home » Akola Shivsena : महावितरणच्या विरोधात मूर्तिजापूरमध्ये शिवसेनेचे बेमुदत उपोषण

Akola Shivsena : महावितरणच्या विरोधात मूर्तिजापूरमध्ये शिवसेनेचे बेमुदत उपोषण

by Navswaraj
0 comment

अकोला Akola : मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, जळालेले रोहित्र कोणतेही शुल्क अथवा विजबिल न भरून घेता बदलण्यात यावे, व्होल्टेजचा प्रश्न निकाली काढण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अप्पू तिडके, विधानसभा संघटक गोपाल भटकर, उपसभापती देवशिष भटकर, शेतकरी सेनेचे तालुका संघटक रुपेश कडू आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (Akola’s Shivsena Uddhav Thackeray Group on Hunger Strike at Murtizapur for Farmer’s Against Mahavitaran)

शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाविरुद्ध आता महावितरणबद्दल शिवसेना आंदोलनात्मक भूमिकेत आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडुन त्रास होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. मूर्तिजापूरच्या महावितरणकडुन तालुक्यातील शेतकऱ्यांना विनाकारण मानसिक त्रास देण्यात येतोय. वीजबिलाचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यावर लादण्यात येतोय. कृषी पंपांची जोडणी प्रलंबित आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो. यासंदर्भात वारंवार चर्चा केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यानं आता उपोषण सुरू करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!