Home » पूजा भटकरने पटकाविले दक्षिण कोरीयात सुवर्ण

पूजा भटकरने पटकाविले दक्षिण कोरीयात सुवर्ण

अकोल्याच्या जुने शहर पोलिस ठाण्यात आहे कार्यरत

by Navswaraj
0 comment

अकोला : दक्षिण कोरीया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर क्रीडा स्पर्धेत अकोल्याची खेळाडू पूजा भटकर हिने सुवर्णपदक पटकावले आहे. लांब उडी व तिहेरी उडी गटातून तिला सुवर्णपदक तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे.

१३ मे ते २० मे दरम्यान दक्षिण कोरीया येथे एशिया पॅसिफिक मास्टर क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये अकोल्याच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या पूजा भटकर हिने ३० वर्षे वयोगटातील स्पर्धेत सहभाग नोंदविला. यात तिने सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, प्रशिक्षक सागर देशमुख यांचे मार्गदर्शन तिला यासाठी लाभले. पूजाच्या या यशाबद्दल अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पूजाचा सत्कार केला. पूजा ही जुने शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!