Home » गाडीचे टायर फुटल्याने अकोला पोलिसांचे वाहन अपघातग्रस्त

गाडीचे टायर फुटल्याने अकोला पोलिसांचे वाहन अपघातग्रस्त

by Navswaraj
0 comment

अकोला : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे वाहन परत येत असताना टायर फुटल्याने अपघातग्रस्त झाले. पातुर बाळापूर मार्गावर असलेल्या बाभुळगाव जवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये सात जण जखमी झालेत. जखमींमध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेसाठी अकोला पोलिस मुख्यालय येथुन काही कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. यात्रेतील बंदोबस्त आटोपल्यानंतर सर्व पोलिस कर्मचारी शासकीय टाटा सुमो वाहनाने परत येत होते. परतीच्या प्रवासात पोलिसांच्या एम.एच 30 एच 506 क्रमांकाच्या वाहनाचे टायर फुटले. या अपघातात अकोला पोलिस दलातील सुनिल वाघ, कुंदन इंगळे, अश्वजित सदार, उमेश सानप, होमगार्ड गजानन घेघाटे, मोहम्मद यासिर, संजय शिरसाट जखमी झालेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सातही जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलिसांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!