Home » अकोला पोलिसांनी जप्त केली भांग आणि दारू

अकोला पोलिसांनी जप्त केली भांग आणि दारू

by Navswaraj
0 comment

अकोला : पोलिसांच्या विशेष पथकाने लककडगंज परिसरात मनोज रामहरक बलोडे याच्याकडे छापा टाकत अवैधरित्या असलेले मादकपदार्थ भांग आणि मद्यसाठा जप्त केला.

मनोज घरात मादक अमली प्रतिबंधित पदार्थ भांग विनापरवाना बाळगून विक्री करताना आढळला. पोलिसांनी ओली व सुकी अशी आठ किलो भांग जप्त केली. त्याची किंमत आठ हजार रुपये आहे. लककडगंज गवळीपुरा परिसरात बानुबाई नत्थु चौधरी हिच्या घरझडतीमध्ये 40 लिटर मोहाची दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत चार हजार रुपये आहे. दोन्हीही आरोपींच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम कलम 65 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!