Home » अकोल्यातील पिंजारी गल्लीत चालणाऱ्या जुगार अड्डयावर छापा; पाच अटकेत

अकोल्यातील पिंजारी गल्लीत चालणाऱ्या जुगार अड्डयावर छापा; पाच अटकेत

by Navswaraj
0 comment

अकोला : पिंजारी गल्लीत चालणाऱ्या जुगार अड्डयावर अकोला पोलिसांनी छापा घालत पाच जणांना अटक केली. काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला.

छाप्यात पाच जणांना रंगेहाथ जुगार खेळताना पकडण्यात आले.  त्यांच्या जवळून रोख 11 हजार रुपये, चार मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी शेख हुसेन अकिल मोहम्मद, शेख शकील शेख बाबू, जकीर हुसेन निसार अहमद, इसामुद्दीन मोहिनुद्दीन, सिद्दार्थ अरुण सदांशीव यांना अटक केली. शहर कोतवाली पोलिस ठाणे येथे पाचही जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आलला आहे. पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!