Home » अकोला पोलिसांनी नाकाबंदीत जप्त केल्या 38 दुचाकी

अकोला पोलिसांनी नाकाबंदीत जप्त केल्या 38 दुचाकी

by Navswaraj
0 comment

अकोला : मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणाऱ्या भागात अँटी चैन स्नाचिंग मोहीमअंतर्गत वेगवेगळ्या मार्गामध्ये नाकाबंदी करण्यात आली.  वाहनांची मूळ कागदपत्रे नव्हते अशी 38 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

शहरातील सायलेन्सरव्दारे फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात बदल करणाऱ्या मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विशेष मोहीम राबवत शहरातील रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन पाच वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

अकोला शहरातील उड्डाणपुलावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतूककिस अडथळा निर्माण करीत असलेल्या एकूण 44 वाहनधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. आगामी सण-उत्सवादरम्यान मद्य प्राशन करीत वाहन चलविणाऱ्या व्यक्तींचे वाहतूक शाखेकडून चौकचौकात तपासणी केली जात आहेत. मद्य सेवन करून वाहन चालवू नये, मोबाईलवर संभाषण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करुन गुन्हा नोंदविण्यात येईल असा ईशारा पोलिस निरिक्षक विलास पाटील यांनी दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!