Home » Akola Forts : अकोल्यातील गडकिल्ल्यांसाठी मुनगंटीवारांनीच घ्यावा पुढाकार

Akola Forts : अकोल्यातील गडकिल्ल्यांसाठी मुनगंटीवारांनीच घ्यावा पुढाकार

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, नरनाळा, भैरवगड, जाफराबाद आणि तेलीयागड असे एकूण सहा ऐतिहासिक किल्ले आहेत. बाळापूर येथील छत्री, बार्शीटाकळीचे कालंका मंदिर, पातूर येथील बुद्धकालीन लेणी अशा पुरातन वास्तू आहेत. परंतु सर्व किल्ले आणि वास्तू दुर्लक्षित आहेत. त्यांची पडझड झाल्यामुळे परिस्थिती अतिशय दयनीय आहे. चंद्रपुरातील पुरातन वास्तुंसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी खेचून आणला. आता मुनगंटीवार यांनी अकोल्यालाही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (Akola District Unnoticed Six Historical Forts And Ancient Architectural Condition Is Pitiable Citizen’s Demand Sudhir Mungantiwar To Give Justice)

स्वातंत्र्यनंतर जिल्ह्यातील कुठल्याही पक्षाच्या जनप्रतिनिधींनी ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंच्या देखभालीसाठी प्रयत्न केला नाही. परिणामी त्यांची दूरवस्था झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले व 14 पुरातन वास्तुंची देखभाल व विकासासाठी 59 कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंची देखभाल पुरातत्व विभाग करते. राज्याचे अर्थमंत्री असताना मुनगुंटीवार यांनी पुरातत्व विभागाचे पूर्वी असलेले 22 कोटींच्या वार्षिक बजेटमध्ये वाढ करून 500 कोटी केले.

अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ऐतिहासिक किल्ले आणि पुरातन वास्तुंकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे सांस्कृतिक, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चंद्रपूरप्रमाणे अकोला जिल्ह्यातील किल्ले आणि पुरातन वास्तुंच्या देखभालीसाठी शासनाकडे प्रयत्न करावेत अशी अकोलेकरांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!