Home » अकोला | अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा

अकोला | अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा

by Navswaraj
0 comment

अकोला : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) शायना पाटील यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि बळजबरीने पळवून नेल्याची फिर्याद पीडितेच्या आईने जुने शहर पोलिस ठाण्यात दिली होती. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्याम तायडे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, उमेश माने यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटला सुरू झाल्यानंतर सरकारच्यावतीने एकूण दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. साक्षीदारांचे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मोहम्मद जाजीम उर्फ ​​नदीम मोहम्मद हुसेन (वय २७, रा. जयरामसिंग प्लॉट, जुने शहर) याला १० वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस कारावास. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश अकोटकर यांनी बाजू मांडली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फजलुर रहमान काझी आणि वैशाली कुंबलवार यांनी सहकार्य केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!