Home » अकोल्यात महाआरतीच्‍या माध्‍यमतून सामाजिक ऐक्‍याचा अनोखा संदेश

अकोल्यात महाआरतीच्‍या माध्‍यमतून सामाजिक ऐक्‍याचा अनोखा संदेश

by Navswaraj
0 comment

अकोला : लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरूध्‍द जनजागृती करण्‍यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची मुहूर्तमेढ रोवली. सद्भावना, सलोखा, सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्‍ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्‍सव साजरा होणे आज अपेक्षित असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. गणेशोत्सव विसर्जनानिमित्त भाजपातर्फे स्वागत तसेच भारतीय जनता पार्टी कार्यालय येथील गणेश विसर्जन व महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री गणेशाची महाआरती आयोजित करून सामाजिक ऐक्‍याचा अनोखा संदेश दिला आहे. या गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून समाजसेवेचा, लोककल्‍याणाचा संदेश सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचेल, असा विश्‍वास आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्‍यक्‍त केला. जय हिंद चौक येथे भाजपातर्फे दरवर्षीप्रमाणे श्री बाराभाई, राजेश्वर, जागेश्वर, खोलेश्वर गणपती मंडळात महाआरतीचे आयोजन करण्‍यात आले होते. भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांच्या संकल्‍पनेतून कार्यालयात सुंदरकांड भजनसंध्या, पाठ, छप्पन भोग, अथर्वशीर्ष पठन करण्यात आले.

आमदार शर्मा यांनी दरवर्षीप्रमाणे झांज व ढोल वाजून भक्तांचा उत्साह वाढविला. बाराभाई गणेश उत्सव मंडळाच्या पालखीला त्यांनी खांदा दिला. भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांच्या हस्ते सतत 20 वर्षांपासून गणेश भक्तांचा सन्मान करण्यात येत आहे. यंदाही हा सन्मान करण्यात आला. आमदार खंडेलवाल, विजय अग्रवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, किशोर पाटील, नाना कुलकर्णी, माधव मानकर, नीलेश निनोरे, संजय जिरापुरे, श्रीकृष्ण मोरखडे, अनिल गावंडे, किरण थोरात, अभिमन्यू नळकांडे, माजी महापौर सुमन गावंडे, चंदा शर्मा, रामजी कुचके, किशोर कुचके, गणेश तायडे, हरिभाऊ काळे, विजय इंगळे, जयंत मसने, राजेश बेले, देवानंद शिरस्कार, अक्षय जोशी, संजय जोशी, पप्पु वानखडे, तुषार भिरड, शाम विंचनकर, अतुल अग्रवाल, मोहन पारधी, देवाशिष काकड, भूषण इंदोरिया, भूषण सारसे यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!